कोल्हापूर : आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून दोन युवक दहशत माजवत आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली त्यानुसार या विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पो. अंमलदार सागर चौगले ,सुरेश पाटील, रुपेश माने ,अमित सर्जे,अशोक पोवार, युवराज पाटील आदींनी घुंगुर तालुका शाहूवाडी येथे दोघांना मोटरसायकल सह ताब्यात घेतले यावेळी त्यांनी मोटरसायकलला तलवारी बांधलेल्या आढळून आल्या.
उत्तम मारुती कांबळे वय 27 रा. घुंगुर व प्रवीण दौलत लोखंडे वय 20 रा. आमिनी ता.शाहूवाडी असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहेत.त्यांच्याकडून यामाहा मोटारसायकल व गाडीला बांधलेल्या 3 तलवारी असा 1 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाले आहे.