चंदगड:
चंदगड तालुक्यातील शिनोळी खुर्द येथे “अंदर बाहर” नावाचा पत्याचा जुगार खेळला जात आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके ,दीपक घोरपडे, रामचंद्र कोळी, समीर कांबळे ,राजू कांबळे ,सतीश जंगम, वसंत पिंगळे आदी पोलिसांनी छापा टाकून खेळाचा मुख्य मालक रतन शंकर पचेरवाल वय 66 रा.संभाजीनगर कोल्हापूर यांच्यासह जुगार खेळणाऱ्या 58 जणांना पकडले.
त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये रोख 55 मोबाईल हँडसेट जुगाराचे साहित्य असे 6 लाख 78 हजार किमतीचा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईने गडहिंग्लज विभागात खळबळ उडाली आहे