Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALपी.एन. पाटील यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी राहुल पाटील यांना विजयी करा :...

पी.एन. पाटील यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी राहुल पाटील यांना विजयी करा : आमदार प्रा .आसगावकर

सांगरूळ /वार्ताहर:
सर्वसामान्य शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची विधिमंडळात अभ्यासपूर्ण मांडणी करत ते सोडवण्याचे काम स्वर्गीय आमदार पी एन पाटील यांनी केले आहे .गांधी घराणे व पक्षनिष्ठा म्हणजे काय याचा आदर्श कोल्हापूर जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण राज्याला घालून दिला आहे .त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी राहुल पाटील यांना विधानसभेत पाठवूया असे आवाहन आमदार प्रा .जयंत आसगावकर यांनी केले .सांगरूळ ( ता . करवीर ) येथे आयोजित सांगरुळ पंचायत समिती गणातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते . यावेळी महाविकास आघाडीचे करवीर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी बोलताना आमदार आसगावकर म्हणाले पी एन पाटील यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांच्या शब्दाला शासन दरबारी व राजकीय क्षेत्रात वजन होते . त्यांच्या अचानक जाण्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असून त्यांच्या कार्याचा वारसा जपण्यासाठी राहुल पाटील यांच्या रूपाने एक प्रामाणिक लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवूया असे आवाहन आमदार आसगावकर यांनी यावेळी केले .
यावेळी बोलताना करवीर मतदारसंघाचे उमेदवार राहुल पाटील यांनी स्वर्गीय पी एन पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय व सहकार क्षेत्रात काम करताना नेहमीच प्रामाणिकपणे वाटचाल केली आहे .लहान मोठ्या कार्यकर्त्याला पाठबळ दिले आहे .त्यांच्या पश्चात त्यांच्या गटाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आम्हा दोघा भावंडांच्यावर मोठ्या विश्वासाने आपण दिली आहे .ती जबाबदारी पी एन पाटीलसाहेब आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितपणे पार पाडू अशी ग्वाही दिली .
गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी राहुल पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना आपल्या कारकिर्दीत जिल्हा परिषदेच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे .विरोधकांनी बालिशपणाने त्यांच्यावर चुकीचे आरोप करू नयेत असे आवाहन केले
उबाठा गटाचे शाखाप्रमुख प्रशांत नाळे यांनी शिवसेनाप्रमुखांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी राहुल पाटील यांना विजयी करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक जिवाचे रान करील अशी ग्वाही दिली.
स्वागत व प्रास्ताविक टाटा मोटर्स कामगार युनियनचे माजी अध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केले .किसरूळ (ता पन्हाळा ) येथील युवा नेते व जय बलभिम दूध संस्थेचे संचालक अर्जुन पाटील यांनी त्यांच्या बाजारभोगाव पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी गोकुळचे संचालक विश्वासराव पाटील पन्हाळा काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग हिरडेकर यशवंत खाडे निवृत्ती चाबुक भरत खाडे उबाठा गटाचे रवींद्र पाटील करवीरच्या माजी सभापती अनिता जंगम अर्चना खाडे यांचेसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते .आभार श्रीपतराव दादा बँकेचे संचालक कृष्णात चाबूक यांनी मानले .
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News