Monday, November 10, 2025
Google search engine
HomePOLITICALमोठ्या प्रमाणात होणारे प्रवेशच परिवर्तनाची नांदी : समरजीतसिंह घाटगे

मोठ्या प्रमाणात होणारे प्रवेशच परिवर्तनाची नांदी : समरजीतसिंह घाटगे

गडहिंग्लज/प्रतिनिधी:
दि.२७ : पंचवीस वर्षांत पालकमंत्र्यांनी कागल-गडहिंग्लज- उत्तुर मतदार संघ शैक्षणिक व आरोग्य दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी कोणतेही शाश्वत काम केले नाही. पालकमंत्र्यांच्या कारभाराला जनता कंटाळली असून मोठ्या प्रमाणात आमच्याकडे होत असलेले प्रवेश हीच कागल गडहिंग्लज उत्तुर मतदार संघाच्या परिवर्तनाची नांदी आहे. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी केले.करंबळी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले ”
पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले कार्यकर्ते सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडीत प्रवेश करत आहेत. शाश्वत विकासाचे आमचे व्हिजन सर्वसामान्य जनतेबरोबर या कार्यकर्त्यांना उमगले असल्याने ते आमच्या विचारप्रवाहात सहभागी होत आहेत. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो मतदारसंघात शाश्वत विकासासाठीच्या त्यांच्या संकल्पना अमलात आणू. या कार्यकर्त्यांचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल.
येथील जनतेने एक वेळ आमदारकीची संधी द्यावी या भागात पाच आरोग्य केंद्र आणतो. सर्व शाळेत डिजिटल क्लास करून हा भाग शैक्षणिक व आरोग्यदृष्ट्या समृद्ध करतो अशी ग्वाही समरजीतसिंह घाटगे यांनी यावेळी दिली.”
 चंद्रकांत गोरुले म्हणाले,” समरजितसिंह घाटगे यांची शाश्वत विकासाबद्दल असलेली तळमळ प्रेरणादायी आहे. त्यांची कार्यपद्धत पाहूनच आम्ही त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी निवडून आणून शाश्वत विकासासाठी संधी देऊया.”
शिवानंद माळी म्हणाले, ” या निवडणुकीत राजेंच्या सोबत प्रजा असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. शरद पवार यांनी पालकमंत्री मुश्रीफांना सत्ता,पदे दिली. परंतु आता अल्पसंख्यांक म्हणून अन्याय झाला असे म्हणत आहेत. त्यांच्या या चोराच्या उलट्या बोंबा जनता चांगलीच ओळखून आहे. त्यामुळे या निवडणुकीत विचारपूर्वक मतदान करून मुश्रीफांसारखी गद्दारीची प्रवृत्ती आपण गाडूया.”
यावेळी बहिरेवाडीची चंद्रकांत गोरुले उर्फ जंम्बो यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह जाहीर
 प्रवेश केला.
स्वागत व प्रास्ताविक प्रविण माळी यांनी केले. यावेळी गोपीनाथ केसरकर ,बाबासो पाटील, संतोष चिकोडे , चंद्रकांत गोरुले यांनी मनोगत व्यक्त केले.सभेस राजाराम इंगळे, मोहन मोटे, माया कांबळे, अनिल शेरेकर, सतीश दोरुगडे, नारायण पाटील, कुंदन हजेरी, बाळू डाफले, दिग्विजय कुराडे, रवींद्र यादव, गोपाल शेरेकर, श्रीपती कदम ,रवी घोरपडे, अशोक देसाई, सुनील गुरव उपस्थित होते. आभार नंदकुमार येसादे यांनी मानले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News