Wednesday, June 25, 2025
Google search engine
HomePOLITICALराधानगरीची काँग्रेस 'के.पीं'च्या विजयात निर्णायक भूमिका निभावेल : पी.डी.धुंदरे यांचे प्रतिपादन

राधानगरीची काँग्रेस ‘के.पीं’च्या विजयात निर्णायक भूमिका निभावेल : पी.डी.धुंदरे यांचे प्रतिपादन

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यात काँग्रेसची ताकद फार मोठी असून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के पी पाटील यांच्या विजयासाठी ही ताकद निर्णायक भूमिका निभावेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व गोकुळ दूध संघाचे माजी संचालक पी डी धुंदरे यांनी केले.
के पी पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याच्या निमित्ताने येथे काँग्रेसचा मोठा मेळावा झाला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
श्री धुंदरे पुढे म्हणाले,” कोणीही कितीही वातावरण निर्मिती करू दे, परंतु काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हा के पी पाटील यांना एकमुखी असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. केपी यांच्या विजयासाठी आम्ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे असे समजून जीवाचे रान करून राबणार असून काँग्रेसचा अगदी तळागाळातील कार्यकर्ता सुद्धा या निवडणुकीत स्वतःला के पी पाटील समजून कार्यरत राहील.”
तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदुराव चौगले म्हणाले,”काँग्रेस आणि राष्ट्रवादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्यस्तरावर ठरलेल्या धोरणास अनुसरून के पी पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली असून तिन्ही पक्ष हे महाविकास आघाडीचे घटकपक्ष आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे व आताचे शिवसेनेचे के पी पाटील हे मूळच्या काँग्रेसच्या विचाराचे असल्याने तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी म्हणून सुत जुळले आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची केपींच्या मागे मोठी ताकद उभा करण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व निश्चित आघाडीवर राहील.”
भोगावती साखर कारखान्याचे संचालक रवींद्र पाटील यांनी स्वागत व माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले,गोकुळ दूध संघाचे संचालक सर्वश्री प्रा.किसन चौगले,आर.के. मोरे व रणजीतसिंह पाटील यांच्यासह भीमराव चौगले,वसंत पाटील,अशोक साळोखे सुशील पाटील – कौलवकर,संजय कांबळे,विजय मोहिते आदींची भाषणे झाली. ज्ञानदेव पाटील यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी ज्येष्ठ नेते दत्तात्रय हरी पाटील, दत्तात्रय धोंडी पाटील,ए डी पाटील,कृष्णात पाटील,विश्वनाथ पाटील,प्रा ए डी चौगले,अभिजीत पाटील,पांडुरंग भांदिगरे,मोहन डवरी,उत्तम पाटील,बी आर पाटील,विठ्ठल कांबळे,वैभव ताशिलदार,बाजीराव चौगले,चंद्रकांत चौगुले मोहन धुंदरे, आनंदा पाटील आदींसह काँग्रेस पक्षाचे भोगावती व बिद्री साखर कारखान्याचे आजी माजी संचालक,विविध गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News