कोल्हापूर /वार्ताहर: कोल्हापूर जिल्हा दिव्यांग सेना ( सामाजिक संघटना ) पी जे कन्स्ट्रक्शन उचगाव व ग्रामपंचायत अधिकारी संघटना कोल्हापूर यांच्या वतीने उचगांव. ता. करवीर. येथे करवीर तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधव यामध्ये मतिमंद, गतिमंद,अंध, मुख बधिर, व्हीलचेअर अशा दिव्यांगाची दिवाळी साजरी केली.आणि आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या उद्दात भावनेतून जिल्हा अध्यक्ष उत्तम चौगुले यांनी दिवाळी भेट म्हणून 40 दिव्यांगाना दिवाळी साहित्याचं किट तयार करून देण्यात आले.तत्पूर्वी माजी जिल्हा अध्यक्ष स्वर्गीय नारायण मडके. यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरु करण्यात आला.साहित्य वाटप दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष उत्तम चौगुले, महिला अध्यक्ष शोभा चौगुले, सुमित शिंदे, अतुल धनवडे, सूर्यकांत मोरे व दिव्यांग बांधव यांची उपस्थिती होती