Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeगगनबावडा तालुक्यातील कोदेत रेव पार्टी; पोलिसांचा छापा..

गगनबावडा तालुक्यातील कोदेत रेव पार्टी; पोलिसांचा छापा..

साळवण :
कोदे बुद्रूक पैकी आंबेवाडी, (ता. गगनबावडा) येथील नयनील फार्म रिसॉर्ट वर पोलिसांनी आज टाकलेल्या छाप्यात तब्बल 4 लाख एक्कावन्न हजार किमतीचे दारु, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे असून 31 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने पूर्ण गगनबावडा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गगनबावडा पोलिसांच्या कडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार आंबेवाडी (ता. गगनबावडा) येथील “नयनील फार्म रिसॉर्ट” येथे बेकायदेशिर नृत्यांगना घेवुन काही तरुण पार्टी करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहुवाडी विभाग व गगनबावडा पोलीस ठाणे यांचे संयुक्त पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी पार्टीत तोकडे कपडे घालून अश्लील व बिभत्स नृत्य करणाऱ्या 9 नृत्यांगना, बेकायदेशीररित्या दारूचे सेवन करत असलेले लोक आढळून आलेत. या कारवाईत 31 जणांविरुध्द गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणेत आला आहे.
यामध्ये पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक  जयश्री जाधव, उपविभागिय पोलीस अधिकारी अप्पासाो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, गगनबावडा पोलीस ठाणे पोना श्रीकांत मामलेकर, पो.हे.कॉ मानसिंग सातपुते, संदीप पाटील, सागर पाटील, पोकॉ दिगंबर पाटील, पोकॉ अशोक पाटील, अमोल तेली यांनी कारवाई केली.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News