Saturday, December 6, 2025
Google search engine
HomeSocialऐन दिवाळीत पन्हाळ्यातील  फेरीवाल्यांची दिवाळी कडू..

ऐन दिवाळीत पन्हाळ्यातील  फेरीवाल्यांची दिवाळी कडू..

पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर.:
ऐन दिवाळी पन्हाळा तीन दरवाजा परिसरातील फेरीवाल्यांचे व्यवसाय काढून त्यांच्यावर बेकाराची कुराड कोसळली आहे. त्यांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडू झाली आहे. ढकलगाड्यांच्या जाग्यांवर टू व्हीलर पार्किंग करण्यात आले आहे. मग या जागांवर पर्यटकांच्या टू व्हीलर गाड्या लागल्या आहेत.
त्यामुळे गडावरील मूळ व्यवसायिकांची मोठी गोची झाली आहे.  दारुगोळा ऐतिहासिक इमारती जवळ नगरप्रशा सनाने दुकाने दिली आहेत परंतू ही एकदम पिछाडी बाजू असल्यामुळे  व्यवसाय होत नाही. 
तीन दरवाजा परिसरातील 32 व्यावसायिकांना पन्हाळा नगरपरिषदेने फेरीवाल्यांना त्यांचे स्टॉल काढण्याबाबत नोटीस दिली  होती. सर्व व्यवसायिकांनी स्वतः तेथून काढून घेतले व नगरपरिषदेला सहकार्याची भूमिका घेतली पण प्रशासनाने कोणतीही पर्यायी जागा दिलेली नाही. त्यात गेली 45 ते 50 दिवस हा व्यवसाय बंद असल्याने   हातावर  पोट असणाऱ्या व्यावसायिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे  व्यवसायासाठी  पर्यायी जागा उपलब्ध करून प्रशासनाने द्यावी अशी मागणी व्यवसायिकांच्यातून होत आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News