Thursday, June 19, 2025
Google search engine
HomeSocialआदमापूरात बलिप्रतिपदा, दीपावली पाडव्या निमित्त लेंडीपुजन व बकरी बुजवणे कार्यक्रम संपन्न..

आदमापूरात बलिप्रतिपदा, दीपावली पाडव्या निमित्त लेंडीपुजन व बकरी बुजवणे कार्यक्रम संपन्न..

क्षेत्र आदमापूर/प्रा.शिवाजी खतकर-
श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथे बलिप्रतिपदेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.या दिवशी देशभरात ‘दिपावली पाडवा ‘ हा सण साजरा होत असूनदेखिल क्षेत्र आदमापूर येथील संत बाळुमामांच्या पुण्यभूमीत महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र ,कोकण,गोवासह अन्य राज्यातून असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात “बलिप्रतिपदेचा सण” विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला.
सर्वधर्मसमभाव व राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण देणारा श्री.क्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड )येथील सद्गुरु बाळुमामांचा हा “दिपावली उत्सव” प्रतिवर्षी बलिप्रतिपदेनिमित्त  आदमापूर येथील मरगुबाई मंदीराशेजारी असलेल्या बाळुमामांच्या बक-यांच्या तळावर मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होतो.सद्गुरु बाळुमामा यांनी हयात असताना दीपावली पाडव्याच्या दिवशी आपल्या मेंढ्यांची पूजा व बकरी भुजवणे प्रथा सुरु केली.हा सण मोठ्या उत्साहाने भाविकभक्तांनी आजही जोपासली आहे.
पाडव्याच्या आदल्या रात्री याठिकाणी गावातील व अन्य राज्यातून आलेल्या हजारो भावीक महिला बाळुमामांची गीते गाऊन पुरणपोळ्या करतात.तर धनगर बांधव ढोलावर थाप टाकत धनगरी गीते गात रात्र जागवतात.
त्याप्रमाणे याही वर्षी हा सण आदमापूर येथील मरगुबाई मंदिराशेजारी असलेल्या बाळुमामांच्या बक-यांच्या तळावर मोठ्या धार्मिक वातावरणात संप्पन्न झाला.या ठिकाणी महिला भक्तजनांनी बाळुमामांच्या ओव्यांच्या गायनाने ५०० चुलीवर पाडव्याच्या आदल्या रात्री पुरणपोळ्या केल्या.तर धनगर समाजबांधवानी ढोल-कैताळांच्या तालावर धनगरी गीते गाऊन रात्र जागवली.
सद्गुरु बाळुमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याहस्ते बाळुमामा मंदिरातून ढोल-कैताळांच्या निनादात भावभक्तीचा भंंडारा आणणेत आला.यावेळी विविध जातीधर्मातून आलेल्या भाविकभक्तांनी दिपावलीचा फराळ एकत्र करुन प्रसाद करणेत आला.
या उत्सवानिमित्त मरगुबाई मंदीर परिसरात बाळुमामांच्या बक-यांच्या लेंढ्यांची रास करुन राशीला ऊस,कर्दळ,केळी उभी करुन विविध रंगाच्या फुलांच्या माळांनी सजवून या राशीची प्रथम बाळुमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी मनोभावे पूजा केली.लेंढ्यांच्या राशीजवळच एका मातीच्या मडक्यात शेळ्या-मेंढ्यांचे दूध संकलित करुन ते विस्तवावर ठेवले जाते.दुध कुणीकडे व कोणत्या दिशेला ऊतू जाते हे पाहण्यासाठी प्रतीवर्षी प्रमाणे याही वर्षी भाविकभक्तांनी एकच गर्दी केली होती.दूध ऊतू जाण्याची प्रथा या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने जोपासली गेली.गतवर्षीप्रमाणे या ही वर्षी पश्चिम दिशेला दूध ऊतू गेल्याने पश्चिम बाजूकडील भाग” सुजलाम् सुफलाम् “होईल.असे संकेत देण्यात आले.
यावेळी “बकरी भुजविणेचा” कार्यक्रम संपन्न झाला.दूध ऊतू गेल्यानंतर लगेचच धनगराचे धन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळपातीलच काही बक-यांचे पुजन करुन त्यांना हार-तु-यांनी सजवून त्यांच्या पाठीमागे ढोल-कैताळ वाजवुन ,फटाक्यांची आतषबाजी व भंडा-याची मुक्तहस्ते उधळण करुन त्यांना पळविणेत आले.असा ‘बकरी बुजवणे ‘कार्यक्रम साजरा केला गेला.यावेळी हजारो भाविकभक्तांनी ‘बाळुमामांच्या नावान चांगभलं’ च्या जयघोषात आनंद व्यक्त केला.त्यानंतर हजारो भाविकभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावर्षीच्या ऊत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे ऐन दिपावलीचा सण असूनदेखिल आदमापूरला बाळुमामांच्या दर्शनासाठी भाविकभक्तांनी मोठयासंख्यने हजेरी लावलीच.
या ऊत्सवाप्रसंंगी सदगुरु बाळुमामा देवस्थान समितीचे अध्यक्ष ध्यैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रागिणी खडके , सचिव संदीप मगदूम,भाकणूककार कृष्णात डोणे ,नाग्गापा मिरजे, दत्तात्रय पाटील,दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील,दिलीप पाटील, संभाजी पाटील, शामराव होडगे,सरपंच विजय गुरव, इंद्रजित खर्डेकर, राजनंदीनी भोसले, भिकाजी शिणगारे,देवस्थानचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, भुदरगड पोलिस, आरोग्य कर्मचारी,सर्व सेवक,भक्त व ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने दिपावली उत्सव मोठया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News