बालिंगा/मोहन कांबळे: भावा हे कोल्हापूर आहे इथे विषय लय हार्ड असतोय, कुठलेही गोष्ट करायची म्हणलं की ते मनापासूनच केले जाते.
दीपावली उत्सवामध्ये गोड खाऊन कंटाळून गेलेले कोल्हापूरकर आज भाऊबीज आणि त्यातच रविवार ही एक खव्यासाठी कोल्हापूरमध्ये पर्वणीच ठरलीआहे. भल्या पहाटेपासून मटन, चिकन, मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांनी लांबच लांब रांगा लावून खरेदी करत असलेले आज रिंग रोड फुलेवाडी येथे निदर्शनास आले ,अशीच कोल्हापूर मध्ये प्रत्येक ठिकाणची परिस्थिती आहे. या वरून कोल्हापूरकर किती उत्कृष्ट खवय्ये आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आज सकाळ पासुन ही स्थिती आहे तर सायंकाळपर्यंत काय अवस्था होईल याचा विचारच करा.