कोथळी करवीर /तानाजी पोवार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही निवडणुकीचा प्रचार शुभारंभ कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या आशीर्वादाने सुरुवात करायचे. तीच परंपरा जपत शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा 2024 या निवडणुकीच्या महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ कोल्हापूर करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या आशीर्वाद दर्शन घेऊन श्री संत बाळूमामा यांच्या पावन भूमी आदमापूर येथे मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे
असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले आहे