कोल्हापूर: अनैतिक संबंधातून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी रेल्वे रुळावर प्रेत आणून ठेवणाऱ्या तीन आरोपी व चार विधी संघर्ष ग्रस्त बालकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिताफीने ताब्यात घेतले. तारदाळ ता. हातकणंगले हद्दीत खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत रेल्वे गाडी येण्यापूर्वी रुळावर आणून ठेवले होते.
प्रेतावरून रेल्वे गेल्याने दोन तुकडे झाले पण पोलीस तपासात मैताच्या गळ्यावर गळा आवळून खून केल्याची व्रण होते या संशयावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी तपास करून मध्यप्रदेश मधील कामासाठी तारदाळ येथे असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी अनैतिक संबंधातून खून केल्याची कबुली दिली. मयताचे नाव सुनील कुमार भगवानदास रावत मूळ गाव सिद्धी, राज्य मध्यप्रदेश असे आहे. तर पुष्पराज गाडे, संतोष कुमार जोगेश्वर सिंह,शिवेंद्र रामकुशन सिंह यांच्यासह 4 विधिसंघर्षग्रस्त बालके या सर्वांना ताब्यात घेतले.
पुष्पराज गाडे च्या पत्नीशी मयत सुनीलकुमार रावत याचे अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले या समस्यातूनच सुनील कुमारचा सर्वांनी मिळून काटा काढला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटके, जालंदर जाधव महेश पाटील, महेश खोत, संजय कुंभार आदींनी ही कारवाई केली