परिते : भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच तेथील केदारलिंग वि.का.स. संस्थेचे संचालक सुनील आनंदराव कारंडे (आप्पा) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह करवीरचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी जनार्दन पाटील (जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना), सरदार शामराव पवते (मा.सरपंच), आर. के.पाटील (मा.सरपंच), अजित धोत्रे (मा.ग्रा.पं.सदस्य), मधुकर कांबळे (मा.ग्रा.पं.सदस्य), अरविंद कारंडे (अध्यक्ष-करवीर राष्ट्रवादी युवक काँग्रेस), रामचंद्र पोकर्णेकर, अरुण तात्या पाटील, सुभाष पोवार (मा. सरपंच), तानाजी जाधव, जनार्दन पाटील, रंगराव चौगले, साताप्पा पाटील, सर्जेराव महिपती पाटील (अध्यक्ष-भोगावती व्यापारी असोसिएशन) यांच्यासह हजारो कार्यकर्ते यांनी करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी आम.चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दर्शवला.