Wednesday, June 25, 2025
Google search engine
HomePOLITICALराहुल पाटील यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू: माजी आमदार संपतराव पवार ;...

राहुल पाटील यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू: माजी आमदार संपतराव पवार ; वडणगे येथे विराट सभेने प्रचार शुभारंभ

वडणगे :
मी व स्वर्गीय पी एन पाटील यांनी आयुष्यभर राजकीय संघर्ष केला .मात्र आमचा संघर्ष तत्त्वाचा सुसंस्कृतपणाचा व निष्ठेचा होता .त्यामध्ये कधीही पातळी घसरू दिली नाही .तेच संस्कार आज करवीर मतदार संघात आहेत .हा मतदारसंघ कधीही दिशाभूलीला थारा देणार नाही .राहुल पाटील यांच्या रूपाने एक सुसंस्कृत आमदार या मतदारसंघातून निवडून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार पाटील (बापू ) यांनी केले.
यावेळी त्यांनी ज्यांना स्वप्नात ही धामणी प्रकल्प दिसला नाही त्यांनी या प्रकल्पाचे श्रेय घेऊ नये व या मतदारसंघातील जनता बुद्धीभेदाला थारा देणार नाही असा टोला माजी आमदार चंद्रदीप नरके यांना लगावला
महाविकास आघाडीचे वं काँग्रेसचे करवीर मतदार संघातील उमेदवार राहुल पी.पाटील यांच्या वडणगे येथील प्रचार शुभारंभप्रसंगी आयोजित विराट सभेत ते बोलत होते.
प्रारंभी खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी हजारो च्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे लावलेली हजेरी लक्षवेधी ठरली .
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आम. सतेज पाटील म्हणाले, स्व. पी.एन. पाटील यांनी करवीरचा विकास करून राज्यात करवीरला प्रतिष्ठा मिळवून दिली. हाताच्या फोडाप्रमाणे कार्यकर्ते जोपासले. प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात व मनात स्व.पी.एन.आहेत. त्यामुळे निष्ठावंत नेत्याच्या माघारी राहुल पाटील यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहूया. राहुल पाटील यांना आमदार करायचचं असा ठाम विश्वास दिला. तसेच सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला करत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी अजूनही फडणविसांनी माफी मागितली नसल्याची टीका केली.
खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, आपल्या प्रत्येक कार्यात पी.एन.यांनी पक्षनिष्ठा जोपासली. लोकसभा निवडणुकीत गाव अन गाव पिंजून काढून मला दिलेले मताधिक्य कधीही विसरता येणार नाही. त्यामुळे करवीर – पन्हाळा – गगनबावड्यातील जनतेने लोकसभेपेक्षा ज्यादा मताधिक्य देऊन राहुल पाटील यांच्या हात चिन्हासमोर बटन दाबून त्यांना विधानसभेत पाठवूया.
उमेदवार राहुल पाटील म्हणाले, वडिलांच्या निधनानंतर आपण सर्वजण वडीलकीच्या नात्याने माझ्या पाठीशी राहिलात. उमेदवारी यादीतील माझे नाव हे माझे नसून स्व. पी.एन. पाटील व त्यांच्या करवीरच्या जनतेचे आहे. उमेदवारी अर्ज भरताना स्व. साहेबांचा फोटो घेऊन उंचावताना पाहून निष्ठावंतांच्या डोळ्यात मला जे प्रेम दिसले ते कधीही विसरणार नाही. वडिलांची पक्षनिष्ठा व कार्यकर्त्यांवरील प्रेम त्याच ताकदीने जोपसणार, जनसेवेसाठी कायम उपलब्ध राहणार असा मनोदय व्यक्त केला.
यावेळी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे व संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी पी एन पाटील हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते अखेरच्या टप्प्यातच त्यांचा आमचा संपर्क आला .त्यामुळे त्यांच्यातला माणूस आम्हाला ओळखता आला .त्यांची निष्ठा आणि सामान्य कार्यकर्त्यांना ताकद द्यायची पद्धत इतिहासात दखल घेणे योग्य आहे .माजी आमदार चंद्रदीप नरके हे 100 कोटीच्या निधीच्या खोट्या घोषणा करून दिशाभूल करत आहेत शिवसेनेच्या फुटी नंतर त्यांची अवस्था लहान मुलासारखी झाली आहे .त्यांच्या गद्दारीला नेस्तनाबूत केल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असे सांगून ज्यांना स्वतःच्या मतदारसंघाचे नस कळाली नाही त्यांनी आमदारकीचा नाद सोडून द्यावा असा टोला आ हाणला .
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, डॉ. चेतन नरके, राजेंद्र सूर्यवंशी, अमर पाटील शिंगणापूरकर, आरपीआयचे पांडुरंग कांबळे तानाजी आंग्रे, अपर्णा पाटील, राज वैभव, सुनील पाटील, मानसिंग पाटील, संदीप पाटील, दादू कामिरे, सागर पाटील, कु. समृद्धी गुरव आदींची भाषणे झाली. आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, उबाठा जिल्हाप्रमुख संजय पवार, राजेश पाटील, भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, केरबा पाटील, उदयानी साळुंखे, बी.एच. पाटील, क्रांतिसिंह पवार पाटील, बाजीराव पाटील (नाना), बंकट थोडके, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, बजरंग पाटील, शशिकांत आडनाईक, भरत मोळे , शाहू काटकर, बाबासो देवकर, एम.जी.पाटील यांच्यासह आघाडीचे मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक माजी सरपंच सचिन चौगल यांनी केले तर आभार करवीर तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकरराव पाटील यांनी मानले.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News