Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALअन.. सतेज पाटील हसले !

अन.. सतेज पाटील हसले !

कोल्हापूर : अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूर उत्तरमध्ये अत्यंत अनपेक्षित घटना घडली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ज्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचं हात हे चिन्हच नाहीसं झालं. या सगळ्या घटनेनंतर कोल्हापूरमधील काँग्रेस नेते सतेज पाटील हे अक्षरश: ढसाढसारडले पण आज दुसऱ्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सतेज पाटलांना खुदकन हसवलं.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात सुरुवातीपासूनच काँग्रेसकडून घोळ घातला गेल्याचं पाहायला मिळालं. पहिल्यांदा या मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण त्यानंतर दुसऱ्या यादीत त्यांचं तिकीट कापत मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या राजेश लाटकरांनी बंडाचं निशाण फडकवलं आणि अपक्ष अर्ज भरला.
असं असताना, काल (4 नोव्हेंबर) अचानक मधुरिमाराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर राजेश लाटकर हे मात्र अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. या सगळ्या प्रकारामुळे आता या मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा उमेदवारच नसल्याचं चित्र निर्माण झालं
आज उजळाईवाडी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यानी आम . सतेज पाटलांना एका गोष्टीचं मला आणखी बरं वाटलं की, सतेज सोबत आहेत. सतेज इकडे या… सतेज तुमचं नाव घेतल्यावर उत्साह पाहिला का? मी एक गोष्ट चांगली झाली असं का म्हटलं.. की, इथल्या विजयाची जबाबदारी मी आता सतेजवरच टाकतोय. (यावेळी सतेज पाटलांच्या चेहऱ्यावरही हसू फुललं) नाही ही जबाबदारी आता घ्यायला पाहिजे. शाहू महाराजसोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद सोबत आहेत.’ असं म्हणत ठाकरेंनी सतेज पाटलांना बळ देण्याचा प्रयत्न केला.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News