कोल्हापूर : प्रतिनिधी
अनेक वेळा काँग्रेसने कार्यकर्त्यांना जवळ केले त्यांचा वापर झाल्यावर त्यांना फेकून दिले वापरा आणि फेकून द्या अशी संस्कृती काँग्रेसची आहे असा आरोप माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केला.
मरळी (ता. पन्हाळा) येथील शिवपार्वती सेवा संस्था व ज्ञानेश्वर सेवा संस्था यासह चार संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह जवळपास 300 कार्यकर्त्यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी चंद्रदीप नरके बोलत होते.
वाकरे तालुका करवीर येथील अर्चना हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला शिवपार्वती व ज्ञानेश्वर सेवा संस्थेचे संस्थापक टी एम पाटील ज्ञानेश्वर सेवा संस्थेचे संचालक विठ्ठल पाटील वसंत पाटील पन्हाळा बावडा औद्योगिक संस्थेचे संचालक भिकाजी पाटील, शिवपार्वती दुध संस्थेचे चेअरमन सविता पाटील ,व्हा. चेअरमन वनिता पाटील माजी व्हा. चेअरमन भगवान तळसकर यांच्यासह जवळपास तीनशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.