कोल्हापूर : स्वाधार नगर येथील मनोरा हॉटेलजवळ एक युवक बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस वैभव पाटील व गजानन गुरव यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या सहकार्यांनी सापळा रचून विजय राजेंद्र कांबळे वय २६ रा . सुर्वेनगर याला ताब्यात घेतले . त्याच्याकडे १ लाख २ हजार किमतीचे १ पिस्टल व २ जिवंत राउंड मिळून आले . सहाय्य्क पोलीस निरीक्षक चेतन मसूटगे तसेच संतोष बरगे योगेश गोसावी , प्रदीप पाटील विशाल खराडे परशुराम गुजरे यांनी हि कारवाई केली .