Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALमहाविकास आघाडीच्या उमेदवारांना आरपीआय गवई गटाचे पाठबळ

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आरपीआय गवई गटाचे पाठबळ

कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने पाठिंबा दिला आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडी घटकपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संघटक बबन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी केला. बबन शिंदे व सहकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.  
यावेळी बबन शिंदे म्हणाले, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न ओळखून ते सोडवण्यासाठी काँग्रेससह घटकपक्षांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या पक्षांचे हात आणखी बळकट करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आ.ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते सक्रीय सहभागी होणार आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील असा विश्वास बबन शिंदे यांनी व्यक्त केला. 
आमदार सतेज पाटील म्हणाले, आरपीआय गवई गटाने दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले. या पाठिंब्यामुळे आमची ताकद आणखी वाढली आहे. यानिमित्ताने समविचारी एकत्र येत असल्याचा आनंद आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीने नेहमीच सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. सामान्य जनतेचे हित आणि सर्वांगीण विकास हाच महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. याला जनतेतून मोठा पाठींबा मिळत असल्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल. 
यावेळी टी. के. पाटील, पंडित चौगले, कृष्णात कांबळे, वरदान गागडे, हर्षवर्धन पासवान, केदार देवळेकर, गौरव शिंदे, ऋतिक आवळे, प्रकाश सुतार, सतीश कोळी, सुजल गोपकर, सुजात थोरात, विपुल शिंदे, हर्षद कांबळे, अथर्व कांबळे, अनुपम पांडे, शिवाजी कांबळे, हर्षद भोसले आदि उपस्थित होते. 
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News