Thursday, June 19, 2025
Google search engine
HomePOLITICALविकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विजयी करुया : जगदीश चौगले

कोल्हापूर: आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता.करवीर) येथील हनुमान दुध संस्थेचे अध्यक्ष जगदीश चौगले यांनी केले. 
चौगले यांच्यासह युवराज पाटील, शंकर चौगुले, बाबुराव पाटील, बाबुराव बाचणकर, ग्रामपंचायत सदस्य आनंदा मडीलगेकर, रविंद्र महाडेश्वर, बाजीराव गोंगाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आ.सतेज पाटील, आ.ऋतुराज पाटील, गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 
आ.सतेज पाटील म्हणाले, चौगले यांच्या या निर्णयाचा आनंद आहे. सर्वसामान्यांना आपला वाटणारा आमदार म्हणून ऋतुराज पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाला पाठबळ देण्याची तुमची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. आ.ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. 
आ.ऋतुराज पाटील म्हणाले, गावच्या सर्वांगीण विकासासाठी गाव एकसंघ राहणे महत्वाचे आहे. ही भूमिका घेऊन चौगले यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करुन आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. या निर्णयामुळे मला विधानसभेच्या विजयासाठी मोठे बळ मिळाले आहे.
गोकुळ संचालक डॉ.चेतन नरके म्हणाले, आ.ऋतुराज पाटील यांनी सर्वांना सोबत घेऊन गेल्या पाच वर्षात धडाडीने काम केले आहे. दक्षिणची जनता त्यांच्या पाठीशी असल्याने ते नक्की बाजी मारतील.
यावेळी गोकुळ संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, बिद्री कारखाना संचालक आर. एस. कांबळे, माजी संचालक श्रीपती पाटील, एस. बी. पाटील, बाजार समिती संचालक सुयोग वाडकर, जि. प. चे माजी सदस्य एकनाथ पाटील, सागर पाटील, एल. एस. किल्लेदार, पी. एम. पाटील, अशोक किल्लेदार यांच्यासह निगवे खालसामधील कार्यकर्ते उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News