मुंबई: राज ठाकरे साहेबांना मानणारा वर्ग आहे आमचा, पण माझं एकच सांगणं आहे त्यांना की, त्यांनी या लफड्यात पडायची गरज नाही देवेंद्र फडणवीसांचं ऐकूण, यानंतर तुम्ही आरक्षण विषयात बोलू नका, समाजाचं अस्तित्व कसं टीकवायचं हे मला चांगलं माहिती आहे, मी तुमच्यासारखा अस्तित्व गमावून बसणारा नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी संताप व्यस्त केला. पुढं ते असंही म्हणाले की, 57 लाख नोंदी झाल्या असून 2 कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे तुम्ही या भागडीत पडू नका आणि याबद्दल बोलू नका” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
फडणवीस यांचं ऐकूण या लफड्यात पडू नका आणि माझ्या नादी लागू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सभा घेत आहेत. यावेळी मराठा आरक्षणाचा लढा आणि त्याबद्दलची कायदेशी प्रक्रिया अशा मुद्द्यांवर राज ठाकरे आपल्या प्रचार सभेत बोलले होते.यावर म