सांगरूळ:
ऊस दरासाठी आंदोलन असो किंवा निवेदन त्याचा सन्मान माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी कायम राखला आहे.ऊस दराचा तिढा सुटल्याशिवाय कधीही कारखाना सुरू केला नाही.उच्चांकी एफआरपी देण्याची परंपरा चंद्रदीप नरके यांनी कुंभी कारखान्यात आजही कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी विधानसभेपासून कुंभी कासारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चंद्रदीप नरके यांनी काम केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी सांगितले.आमशी येथील प्रचार संवाद यात्रेत जनार्दन पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच आरती सावंत होत्या.
यावेळी बोलताना जनार्दन पाटील म्हणाले २०२३-२४च्या हंगामात ठरल्याप्रमाणे एफआरपी+१०० असा ३२६० रूपये दर देऊन चंद्रदीप नरके यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीचा सन्मान केला. सातत्याने साखर उतारा उच्च ठेवला.उसाची काटामारी कधीही केली नाही.शेतकऱ्यांचा एकही रुपया कुंभी कासारी कारखान्याकडे थकीत नाही.अशा शेतकरी हीत जोपासणाऱ्या चंद्रदीप नरकेना विधानसभेत पाठवण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णय घेतला आहे. काँग्रेसकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्याने निवडणूक विधानसभेची असताना नाहक साखर कारखान्यावर टीका करून फेक नेरेटीव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे याला बळी पडू नका काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांच्या जिल्हा परिषद मतदार संघात कोणताही विकास कामाचा निधी देता आला नाही.त्यांचे वडील पी एन पाटील विधानसभेत असताना सर्वात कमी विकास निधी वापरण्याची किमया केली आहे.यांच्याकडे भोगावतीची सत्ता होती.याकाळात कारखाना कर्जाच्या खाईत लोटला आहे. शेतकऱ्यांची ६० महिने सवलतीची साखर व १० महिन्याचा कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला नाही. भोगावती परिसराने विधानसभेत पाटील यांना मताधिक्य दिले पण रस्तेही करता आलेले.
महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंतचे वीज बिल माफ केले आहे.शेतकऱ्यांना केंद्र व राज्याकडून बारा हजार रुपये सन्मान अनुदान दिले जात आहे. शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणारे ४५ हजार गावातील पानंद रस्ते करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना पाठिंबा जाहीर करत आहे असे सांगितले.
यावेळी डी एस पाटील सरदार सावंत पुंडलिक पाटील मधुकर जांभळे तानाजी पाटील प्रकाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी ज्ञानदेव पाटील अमृता पाटील शिवाजी पाटील मधुकर डांगे उपस्थित होते.