Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALते..वक्तव्य खास.महाडिकांना भोवणार; निवडणूक आयोगाने काढली नोटीस

ते..वक्तव्य खास.महाडिकांना भोवणार; निवडणूक आयोगाने काढली नोटीस

कोल्हापूर:
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारादरम्यान धनंजय महाडिकांनी केलेल्या एका वक्तव्यानं ते आता अडचणीत आले आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक यांना नोटीस बजावली. “काँग्रेसच्या रॅलीत सहभागी झालेल्या महिलांची माहिती घ्या,त्यांची व्यवस्था करतो” या वक्तव्याबद्दल महाडिकांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रुपयांचा लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचाराता दिसल्या तर त्यांचे फोटो काढा… आम्ही त्यांची व्यवस्था करु. आमच्या सरकारचं खायचं आणि  त्यांचं गाण गायचं हे चालणार नाही” असं महाडिक म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. याप्रकरणी धनजय महाडिक यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला गेला आहे.
भाजपचे खासदार धनंजय महाडिक अमल महाडिक यांच्या प्रचार सभेला उपस्थित होते. यावेळी धनंजय महाडिक यांनी भाषण करताना थेट महिलांना इशारा दिला होता. काँग्रेसची रॅली निघाली आणि त्यात महिला दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून घ्या, घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं नाही चालणार असं म्हणत धनंजय महाडिक यांनी थेट धमकीच दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यानंतर धनंजय महाडिक यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची निवडणूक आयोगाने तात्कळ दखल घेतली. आज त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या वक्तव्याप्रकरणी नोटीस देऊन त्यांना आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता ते काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News