गगनबावडा: करवीर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यात प्रचार दौरा झाला.
खडूळे, मुटकेश्वर, लोंघे, किरवे, म्हाळुंगे, साखरी, तिसंगी, टेकवाडी, मुसलमानवाडी, फकीरवाडी, साळवण, निवडे, वेसर्डे, तामकरवाडी, असंडोली, देसाईवाडी/कांबळेवाडी, रावणवाडी, शिंदेवाडी, तळये बुद्रुक (जोशीलवाडी सुतारवाडी), कोदे खुर्द, ठाकूरवाडी, आंबेवाडी, कोदे बु. आदी गावात प्रचार रॅली काढण्यात आली.
यावेळी के.डी.सी.सी बँकेचे माजी अध्यक्ष पी.जी शिंदे, गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गगनबावडा तालुक्यामध्ये मोठा उत्साह आणि चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.