Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomePOLITICALजिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष वाय डी पाटील गटाचा नरकेंना पाठिंबा

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष वाय डी पाटील गटाचा नरकेंना पाठिंबा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.अध्यक्ष कै.श्री.वाय.डी पाटील गटाचा, करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा.आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी गटाचे प्रमुख ॲड. विजयसिंह पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व गटाच्या हजारो कार्यकर्त्यांनी मा.आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. या विधानसभा निवडणुकीला कै. श्री. वाय.डी. पाटील (साहेब) यांचा संपूर्ण गट भक्कमपणे मा.आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही ॲड. विजयसिंह पाटील यांनी दिली.
यावेळी मारूतराव परितकर, सुखदेव पाटील, हिंदुराव माने, रंगराव भोमकर, पोपट चौगुले, बाळासाहेब गुरवळ, दत्ता पाटील, प्रकाश पाटील, भगवान पाटील, तानाजी पाटील, शंकर भोसले, दगडू पवार, नामदेव घोलपे, कृष्णात पाटील, रमेश तळसकर, प्रकाश पाटील, दत्तात्रय गुरव, बाळासाहेब पवार, उत्तम कसोटे, भीमराव साबळे, आबासो पाटील, उत्तम पाटील, रघुनाथ चौगुले यांच्यासह गटाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News