Saturday, December 6, 2025
Google search engine
HomePOLITICALराजेश क्षीरसागर यांना 21 मंडळांचा पाठिंबा..

राजेश क्षीरसागर यांना 21 मंडळांचा पाठिंबा..

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी पेठ मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यावेळी छत्रपती शिवाजी पेठ परिसरातील तब्बल 21 मंडळांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिला.
पद यात्रेची सुरुवात अर्ध छत्रपती शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली.यावेळी स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.मोठ्या उत्साहात निघालेल्या या पदयात्रे दरम्यान महिलांनी औक्षण केलं.यावेळी क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आपल्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध, असल्याचे आश्वासन क्षीरसागर यांनी दिले.
वर्षानुवर्षे राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी पेठेत त्यांनी विविध विकास कामे केली आहेत. यावेळी छत्रपती शिवाजी पेठ परिसरातील तब्बल 21 मंडळांनी जाहीर पाठिंबा क्षीरसागर यांना दिला.यावेळी या पदयात्रेत महायुतीचे भाजपचे सरचिटणीस महेश जाधव अशोक देसाई विशाल शिराळकर पद्माकर कापसे रविकरण गवळी संतोष माळी महेश यादव अमर साठे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News