प्रयाग चिखली वार्ताहर:
क्षेत्र प्रयाग येथील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये कृतिका नक्षत्रावर गुरुवार दि १४ रोजी सायंकाळी सहा वाजले पासून शुक्रवारी उत्तर रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घेतला.
चालू वर्षी गुरुवारी सायंकाळी सहा वाजले पासून पुरुष मंडळींनी गंगेवरील स्नान कार्तिक स्वामी दर्शन आणि दत्त दर्शनासाठी गर्दी केली होती तर महिला भाविकांच्या साठी शुक्रवारी रात्री साडेनऊ पासून ते उत्तर रात्री तीन वाजेपर्यंत दर्शनाचे योग होता त्यानुसार शुक्रवारी रात्री पासून पहाटे तीन वाजेपर्यंत महिला भाविकांनी रांगेने कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घेतला..
मंदिरातील पूजा विधी पुजारी रामगिरी गोसावी व ऋषिकेश गोसावी यांनी पाहिले. दरम्यान येथील तुळजाभवानी फाउंडेशन च्या वतीने संगमावरील घाटावर हजार दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.