Monday, November 10, 2025
Google search engine
HomePOLITICALपैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना भोवळ; हात-पाय फॅक्चर..

पैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना भोवळ; हात-पाय फॅक्चर..

छत्रपती संभाजीनगर:
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे हे आज पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्याने कोसळले. त्यामुळे विलास भुमरे यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. भुमरे यांच्यावरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. विलास भुमरे यांच्यावर थोड्याच वेळात शस्त्रक्रिया होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून गेल्या पंधरा दिवसापासून ते रात्रंदिवस प्रचार करत आहेत. विलास भुमरे हे खासदार आणि माजी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. ते पैठणमध्ये महायुतीकडून मैदानात उतरले आहेत. आज पहाटे भोवळ आल्यामुळे भुमरे कोसळले. ऐन विधानसभा निवडणुकीत दुखापतीमुळे विलास भुमरे यांच्यावर प्रचार बंद करण्याची वेळ आली आहे. विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे नियोजित दौरे रद्द करण्यात आलेत.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News