Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALखानविलकर गटाचा महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा ..

खानविलकर गटाचा महायुतीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा ..

कोल्हापूर :
दिवंगत लोकनेते माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी पाहिलेल्या कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सत्यात उतरत आहे . त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भरगोस निधी दिला आहे . यामुळे खानविलकर कुटुंब जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विजयासाठी त्याना जाहीर पाठिंबा देत आहेत . अशी माहिती राजलक्ष्मी खानविलकर व विश्वविजय खानविलकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे .
सर्व उमेदवारांच्या विजयासाठी ताकदीने प्रचारात उतरलो आहे अअसेही त्यांनी पत्रकात म्हंटले आहे . दिवंगत लोकनेते दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले . पंचगंगा प्रदूषण मुक्ती , सीपीआर सक्षमीकरण यासाठी त्यानी केलेले काम जनता विसरलेली नाही .
खानविलकर साहेबानी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यसह महायुतीच्या नेत्यामद्ये आहे तसेच कोल्हापुरात अद्ययावत नवीन हॉस्पिटलची उभारणी तसेच उद्योग वाढीसाठी या शासनाने केलेले काम उल्लेखनीय आहे . म्हणून या शासनाला पाठिंबा देत असून खानविलकर कुटुंब व खानविलकर गटाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा देत असल्याचे त्यांनी पत्रकात म्हंटले आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News