Friday, December 12, 2025
Google search engine
Homecrimeकरवीर विधानसभेचे जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

करवीर विधानसभेचे जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

कळे: करवीर विधानसभेचे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे प्रचारातून परतत असतांना अज्ञातांनी रात्री जीवघेणा हल्ला केला. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, घोरपडे हे जांभळी खोऱ्यातील मानवाड (ता.पन्हाळा) येथे प्रचारासाठी गेले होते. परत येतांना  सहा-सात अज्ञात व्यक्तीनी त्यांची गाडी अडवली. तेंव्हा मदतीची गरज आहे असे समजून घोरपडे यांनी गाडी बाजूला घेतली व गाडीतून उतरले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता काठी व धारदार शस्त्राने हल्ला केला. यात घोरपडे यांच्यासोबत असणारे डॉ. शुभम जाधव (मांडुकली, ता. गगनबावडा) हे  जखमी झाले व हल्लेखोर शेतात पळून गेले. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या हाताला व डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले.
यावेळी कार्यकर्त्यांना घडला प्रसंग समजताच सुरेश सुतार, युवराज बेलेकर, संजय पाटील, अमर देसाई, एकनाथ पाटील, जितेंद्र देसाई, संभाजी कापडे, मानसिंग भोसले, संभाजी कापडे, बाबासाहेब देसाई, व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. संगीता निंबाळकर यांच्यासह परिसरातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
रात्री उशिरा कळे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. आज जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने  निषेध सभा आयोजित करण्यात येणार आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News