कोल्हापुर : दिगवंत लोकनेते दिग्विजय खानविलकर यांच्या पत्नी श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर, सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांनी खानविलकर गटाच्या वतीने महायुतीच्या सर्वच उमेदवारांना पाठींबा दिला आहे .
दरम्यान श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर, सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांनी करवीर महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी करवीरच्या पश्चिम भागातील बालिंगा , पाडळी , कुडित्रे , भामटे , चिंचवडे या गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्यासोबत चर्चा केली . तसेच नरके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले . त्यांच्यासोबत करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील (भुयेवाडीकर ) यांच्यासह कार्यकर्ते प्रचारासाठी उतरले आहेत .
त्यांच्यासोबत बाजीराव पाटील , बाळासो देसाई , कुंडलिक पाटील , शिवाजी देसाई , सुरेश पाटील , के डी पाटील , विलास पाटील , विलास देसाई , के डी धुंदरे , संजय शिपुगडे यांनी सहभाग घेतला . या दौऱ्यात कार्यकर्त्यांनी चंद्रदीप नरके यांना मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले . चंद्रदीप नरके यांना खानविलकर गटाचा पाठिंबा मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे.