कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी आज आपल्या बोरगाव तालुका पन्हाळा या गावी मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला अशी यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आपणही मतदान करून हा हक्क बजावावा. माझे एक पाऊल लोकशाही सक्षम करण्याकडे असेल असेही यावेळी ते म्हणाले.