कसबा बावडा : येथील मतदान केंद्रावर आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी,संविधानाच्या सन्मानासाठी आणि लोकशाही सक्षम करण्यासाठी मी मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे.या निमित्ताने मी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की, आपण सर्वांनीसुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावावा. असे आवाहन केले.
गेली महिनाभरापेक्षा जास्त काळ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने मला दक्षिणच्या सर्व जनतेने अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, पाठबळ दिले आणि आशीर्वाद दिला. या जोरावर या निवडणुकीमध्ये मी निश्चित विजयी होईन असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.