पन्हाळा प्रतिनिधी (शहाबाज मुजावर):
दिनांक 21नोव्हेंबर रोजी केर्ले येथील जिल्हा परिषद शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून जखमी झालेल्या सहावीतील विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता.पण आज सीसीटीव्ही मध्ये खरा प्रसंग उघड झाला.
मृत स्वरूप लघुशंकेसाठी वर्गाबाहेर गेला असता त्याच्या डोक्यात लोखंडी गेट पडून मृत्यू झाला असे जबाबात शिक्षकांनी सांगितले होते.पण आज शाळे जवळील सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यामध्ये शिक्षकांकडून छोट्याशा मुलांना गेट उचलण्यासाठी सांगितले होते. व ते उचलताना त्याच्या डोक्यात पडले व मृत्यूचे कारण बनले हे सिद्ध झाले.
ते गेट पूर्वीपासूनच नादुरुस्त परिस्थितीमध्ये होते. स्वरूपच्या ताकतीचा, बुद्धीचा विचार न करता त्याला ते काम लावले गेले. त्यामुळे या घडलेल्या घटनेला सर्वस्वी शिक्षक जबाबदार आहेत असे लोकांचे मत आहे.
या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. घडलेल्या घटनेने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.