दिंडनेर्ली :
नंदगाव तालुका करवीर या गावात कोल्हापूर नंदगाव या मेन रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आलेल्या आरसीसी गटर्स बंदिस्त नसल्यामुळे वारंवार अपघाताचे प्रकार घडून येत असून आज एक अजब अपघात घडून आला. कोल्हापूर शहराला जोडणारा मुख्य रस्ता असल्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील खेड्यांमधून हा रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे इथे वाहनांची वर्दळ ही खूप असते त्यातच आज सकाळी एकोंडी गावचा एक शेतकरी आपल्या म्हैशीला घेऊन जात असताना वाहनांच्या वर्दळीमुळे म्हैस घाबरली व इतरत्र पळत असताना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या आरसीसी गटर्स मध्ये पडली व गटर्समध्येच अडकून बसली त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाल्यामुळे वाहतूक कोंडी ही झाली. पण त्यातील अनेक नागरिकांनी पुढे सरसावत अथक प्रयत्नानंतर त्या म्हैशिला गटर्स मधून बाहेर काढले.
प्रशासनाने पुढील धोका लक्षात घेऊन लवकरात लवकर हि गटर्स बंदिस्त करावीत अशी मागणी नागरीकातून होत आहे.