कोल्हापूर:
आप ने गोखले कॉलेज ते माऊली चौक या रस्त्याचे कोअर घेऊन के आय टी कॉलेजच्या नामांकित लॅबमध्ये तपासणीसाठी दिले होते. रस्त्यातील डांबराचे प्रमाण, म्हणजेच बिटूमीन कंटेन्ट 4.5% इतके आवश्यक असताना या टेस्टमध्ये ते फक्त 3.76% इतके असल्याने रस्त्यातले डांबर कोणी खाल्ले असा आरोप आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.
नगरोत्थान योजनेतून शहरात शंभर कोटी रुपयांचे रस्ते करण्याचे काम सुरु आहे. या कामाचा दर्जा राखला जावा यासाठी आवश्यक त्या चाचण्या कराव्यात यासाठी आप चा महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.



