Sunday, December 7, 2025
Google search engine
Homecrimeनंदगावमध्ये महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास मारहाण..

नंदगावमध्ये महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास मारहाण..

दिंडनेर्ली:
अश्लील हावभाव व मोबाईल वरून चॅटिंग करून त्रास देऊन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नंदगाव (ता.करवीर) येथील दोन तरुणांच्या वरती इस्पुर्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष चौगले,ओंकार घरमोडे (रा. नंदगाव) असे त्या तरुणांचे नाव आहे.गीता मोहन चव्हाण यांनी फिर्याद दिली.
आशिष चौगले याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी मोहन चव्हाण,गीता चव्हाण,चंदन कंदलगावे (रा. नंदगाव) यांचे विरोधात आशिष चौगले याने फिर्याद दिली असून परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे.
जखमी आशिष चौगले याचेवरती उपचार सुरू असून इतर तिघांना २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदगाव ते द-याचे वडगाव रोडवरती रात्री ११ वाजता मोहन चव्हाण यांने आशिष चौगले याची गाडी आडवून माझ्या बायकोकडे का बघतोस तुला मी आता दाखवतो अशी धमकी देऊन पायावर,पाठीत, हातावर लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी करून जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली.त्यामुळे मोहन चव्हाण,गीता चव्हाण,चंदन कंदलगावे (रा. नंदगाव) यांचे वरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष चौगले व ओंकार घरमोडे हे पंधरा दिवसापासून हातवारे करून अश्लील गाणी म्हणत होते. तसेच मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे मनास लज्जा उत्पन्न होईल असे मेसेज करून त्रास देत होते त्यामुळे फिर्यादी गीता चव्हाण(रा. नंदगाव) यांनी इस्पुर्ली पोलिसांत फिर्याद दिली असता गुन्हा दाखल करण्यात आला. परस्पर विरोधी फिर्यादी दाखल असून ओंकार घरमोडे, मोहन चव्हाण,चंदन कंदलगावे यांना २९ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.अधिक तपास करवीर चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर करीत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सायंकाळी सुजितकुमार क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.जे मगदूम यांनी नंदगाव येथे भेट देऊन माहिती घेतली.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News