शिंगणापुर:
लक्ष्मी कॉलनी शिंगणापूर ता .(करवीर) येथील प्लॉट धारकांनी वेळोवेळी राज उत्पादन शुल्क ला तक्रार दाखल करून देखील प्लॉट नंबर 36 मिळकत नंबर 28 51 मधील हॉटेल बियर बार व परमिट रूम या व्यवसायाला परवानगी देण्यात आले आहे .तरी तात्काळ परवानगी रद्द करण्यात यावे असे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना कॉलनीतील महिला वर्गाने दिले तसेच त्याची एक प्रत करवीची नूतन आमदार चंद्रदीप नरके यांनाही दिली आहे.
शिंगणापूर लक्ष्मी कॉलनीतील जिथे बियर बार होणार आहे हे ठिकाण रेसिडेन्सी एरिया असून या ठिकाणी कॉलनीतील स्त्रियांची दररोजच्या दळणवळण ,शाळेला जाणाऱ्या मुलांच्या रस्ता आहे .नियोजित बार पासून कॉलनीतील मुलांच्या खेळाचे मैदान ,बगीच्या ,मैदान परिसरात दरवर्षी गणेशोत्सव विशाल तीर्थयात्रेचे विविध कार्यक्रम करण्यात येतात येथे नियोजित मंदिराचे काम सुरू होणार आहे कॉलनीतील विविध कार्यक्रम या मैदानात घेण्यात येतात . सार्वजनिक कार्यक्रमाला व उत्सवाला बाधा येण्याची शक्यता आहे .
बियर बार मंजुरी करता ग्रामपंचायत अंतर्गत लागणारे सर्व कागदपत्रे कोणतेही दप्तरी नोंद नसताना संगणमताने सर्व कागदपत्रे भोगस करून चुकीचे ठराव ,तारीख .घालून देण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे .
परवानगी देण्यात आलेल्या बियरबार जागेवर पाहणे न करता शेजारी प्लॉट धारकांची सहमती न घेता मंजुरी देण्यात आले आहे .प्लॉट धारकांची तक्रार दाखल न घेता परवानगी देण्यात आले असून ती तात्काळ ती रद्द् करण्यात यावे जर परवाना रद्द करण्यात आला नाही तर कॉलनीतील महिला वर्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पटांगणात अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.