Sunday, December 7, 2025
Google search engine
HomeAgriculture"शाहू साखर"ला को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट' साठी देशपातळीवरील "बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड जाहीर

“शाहू साखर”ला को-जनरेशन पॉवर प्लॅन्ट’ साठी देशपातळीवरील “बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड जाहीर

कागलः येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या को- जनरेशन पावर प्लांट साठी देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या को-जनरेशन असोशियशन ऑफ इंडिया या नामांकीत संस्थेचा विशेष श्रेणी वर्गातील सातत्यपूर्ण कामगिरीसाठीचा देश पातळीवरील पुरस्कार आज जाहीर झाला.
यापूर्वीही सलग दोन हंगामात सर्वोत्कृष्ट को- जन पाँवर प्लांटसाठीचा पुरस्कार शाहू साखर कारखान्यास मिळाला आहे. सलग तिसऱ्या वर्षी म्हणजे हंगाम २०२३-२४ साठी हा पुरस्कार पटकाविण्याचा मान शाहू कारखान्याने पटकावला आहे. पुणे येथे शानदार सोहळ्यात को-जन असोसिएशनचे पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या हस्ते पुढील महिन्यात या पुरस्काराचे वितरण होईल. को जन असोसिएशनचे महासंचालक संजय खताळ यांनी या पुरस्कार निवडीचे पत्र कारखान्यास पाठवले.
राष्ट्रीय व राज्य पातळीवर एकूण मिळालेल्या पुरस्कारामध्ये कारखान्यास मिळालेला हा ७१वा पुरस्कार आहे.यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील २७ तर राज पातळीवरील ४४ पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारामुळे त् शाहू साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुरस्कार मिळाल्याची बातमी समजताच शाहू साखर कारखाना परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News