Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeकोल्हापुरातील हॉटेल व्यवसायिका चे अपहरण करून अडीच लाख रुपयाचे सोने लुटले..

कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायिका चे अपहरण करून अडीच लाख रुपयाचे सोने लुटले..

कोल्हापूर-  नागाळा पार्क येथे हॉटेल व्यावसायिक अक्षय सुधीर देशपांडे (वय 28.रा.विश्वकर्मा सोसायटी,खानविलकर पेट्रोलपंप शेजारी ,को.)  त्याची सोन्याची चेन आणि अंगठी जबरदस्तीने काढ़ुन घेऊन नऊ जणांनी मारहाण करून पळुन गेले होते.याची फिर्याद जखमी अक्षय यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली होती.पोलिसांनी नऊ जणांच्यावर गुन्हा दाखल करून त्यातील आकाश उर्फ आकु अनिल सांळुखे (वय 27),विशाल  उर्फ सर्किट अनिल सांळुखे (वय 30.दोघे रा.सोमवार पेठ),,युवराज सुरज मोडीकर ( अण्णा किराणा जवळ, कनाननगर ),प्रणित राजेंद्र मगदूम (वय 26,वळीवडे ) आणि विकेश वसंत मुल्या (घोरपडे गल्ली,शाहुपुरी) या पाच जणांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 डिसे.पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सोहेल उर्फ बॉब शेख मुल्या (रा.घोरपडे गल्ली ,शाहुपुरी) ,हर्षल नार्वेकर (शाहुपुरी) वैभव सांळुखे (नक्की आडनाव माहित नाही) आणि मन्सूर शेख यांचा पोलिस शोध घेत आहेत.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News