कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी माजी नगरसेवक सत्यजीत उर्फ नाना कदम अडीच वर्ष तयारी करत होते पण महायुतीच्या जागा वाटपामुळे ही जागा शिवसेनेला गेली आणि याठिकाणी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली. राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाल्या नंतर त्यांनी नाराज न होता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्वतः उमेदवार असल्या प्रमाणे त्यांनी प्रचार यंत्रणा राबवत राजेश क्षीरसागर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला . त्यासाठी स्वतः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे , श्रीकांत शिंदे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दूरध्वनीवरून सत्यजित कदम यांचे अभिनंदन केले.
निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून सत्यजीत कदम यांनी सुरू असलेल्या कामांची स्वतः पाहणी केली तर ज्या लोकांना प्रचार काळात काम करायचं आश्वासन दिले होते त्या ठिकाणी प्रत्यक्षात संबधित अधिकारी वर्गाला घेवून पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
कोल्हापूर शहरातील बहुप्रतीक्षित अशा कोल्हापूर शहराच्या रिंग रोडच्या कामासाठी ३.५० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ केला तर मोरेवाडी ते एसएससी बोर्ड रोडच्या कामासाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून १२.५० कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी मिळवली असून त्याठिकाणी यूटिलिटी , हेरिटेज स्ट्रीट लॅम्प आणि काँक्रेट आणि डांबरी रस्त्याच्या माध्यमातून रस्त्याच्या कायापालट करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष जातीने हजर राहून स्थानिक नागरिक आणि अधिकारी यांच्या माध्यमातून परिपूर्ण असा आराखडा तयार केला.
त्यामुळे सत्यजीत कदम हे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत.