Saturday, December 6, 2025
Google search engine
Homecrimeहुपरी येथील दोन घरफोड्यांकडून चोरीचा गुन्हा उघड ; सोन्या चांदीसह रोकड जप्त

हुपरी येथील दोन घरफोड्यांकडून चोरीचा गुन्हा उघड ; सोन्या चांदीसह रोकड जप्त

कोल्हापूर: 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हुपरी तालुका हातकणंगले येथे सापळा रचून दोघा घर फोड्यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख असा तीन लाख 71 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. प्रमोद उर्फ पम्या विश्वास वडर, वय 24 रा. वाळवेकर नगर हुपरी व किरण मारुती जाधव, वय 25 रा. शिवाजीनगर हुपरी अशी ताब्यात घेतलेल्या घरफोड्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी सतीश जंगम अमित सर्जे राजू कांबळे महेंद्र कोरवी यांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली. या दोघा गुन्हेगारांकडून सोन्या चांदीचे दागिने रोख 45 हजार असा 3 लाख 70 हजार किंमतीचा मुद्देमाल त्यांचा हुपरी येथील राहत्या घरातून जप्त केला.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News