Monday, November 10, 2025
Google search engine
Homecrimeमोटरसायकल - डंपरच्या धडकेत पती-पत्नी ठार

मोटरसायकल – डंपरच्या धडकेत पती-पत्नी ठार

इचलकरंजी – डंपरने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत होमगार्ड उपपथकाचे अधिकारी सेवा निवृत्त अधिकारी संजय सदाशिव वडिंगे (वय58) आणि सौ.सुनिता संजय वडिंगे (वय 55.रा.रिंगरोड ,मंगळवार पेठ) या पती पत्नीचा मृत्यु झाला.या अपघाताची नोंद इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यात झाली.
इचलकरंजी परिसरात असलेल्या मंगळवार पेठ येथील संजय वडिंगे आणि सौ सुनिता वडिंगे हे पती पत्नी पंचगंगा नदी काठावर असलेल्या वरदविनायक मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते.देवदर्शन घेऊन मोटारसायकल वरुन जात असताना बोरगांव कडुन इंचलकरंजीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या डंपर खाली मोटारसायकल सापडल्याने सौ.सुनिता वडिंगे यांच्या अंगावरुन डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.तर त्यांचे पती संजय वडिंगे यांच्या कंबरेवरुन चाक गेल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ आयजीएम रुग्णालयात दाखल केले.त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना मृत्यु झाला.पती आणि पत्नीचा अपघाती मृत्यु झाल्याने त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News