Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeअंबप खून प्रकरणातील गुन्हेगारांना काही तासातच अटक ; एक बालक...

अंबप खून प्रकरणातील गुन्हेगारांना काही तासातच अटक ; एक बालक ताब्यात

कोल्हापूर: पूर्वीच्या वादातून अंबप तालुका हातकणंगले येथे यश किरण दाभाडे वय- 19 याच्या खुनातील आरोपी हर्षद दाभाडे व त्याच्या साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज ताब्यात घेतले तसेच या गुन्ह्यातील एक अल्पवयीन बालक ही ताब्यात घेतला आहे.
खुनानंतर काही तासातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
दिनांक 2 डिसेंबर रोजी अंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या यश  दाभाडे वय वर्ष 19 यास पूर्वीच्या वादातून हर्षद दाभाडे व त्याच्या साथीदारांनी मिळून एडक्याने मारहाण करून खून केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दोन पथके तयार करून या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावला. घडलेल्या घटनेच्या परिसराची माहिती घेतली त्यावेळी त्यांना यश दाभाडे याने आरोपी हर्षद दाभाडे यास एक वर्षांपूर्वी मारहाण केली होती त्यापासून हर्षद हा यश वर चिडून होता असे सांगण्यात आले होते. मयत यश हा अल्पवयीन असल्याने काही दिवसांपूर्वीच बालसुधारगृहातून सुटला होता. मागील वादातून चिडून हर्षदने त्याच्या साथीदारांच्या मदतीने यशवर येडक्यासारख्या धारदार हत्याराने मारहाण करून त्याला ठार मारले व तेथून सर्वजण पळून गेले होते
तर आरोपीने खुनानंतर आपले इंस्टाग्राम अकाउंटवर “तभी तो दुश्मन जलते है , हमारे नामे 302” अशी पोस्ट केली होती त्यामुळे अंबप परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आरोपी हर्षद दाभाडे व त्याचे साथीदार वारणानगर येथील विजय चौकात येणार होते ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून हर्षद दाभाडे व शफिक उर्फ जोकर शौकत मुल्ला रा. राजे गल्ली, कोडोली तसेच एक बालक यांना ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे शेष मोरे अंमलदार हिंदुराव केसरे युवराज पाटील समीर कांबळे आदींनी पार पाडली. आरोपींना गुन्हा घडल्यानंतर काही तासातच   शिताफीने पकडल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News