दोनवडे : 1 डिसेंबर जागतिक एड्स निर्मुलन दिनानिमित्त एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय खुपिरे यांच्या वतीने गावात एडस् जनजागृती रॅली काढण्यात आली.
यावेळी रुग्णालयात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये पोस्टर प्रदर्शन, शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ सुधाकर ढेकळे यांनी एच आय व्ही संसर्गित लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणारं नाही या विषयी कायद्याची माहिती दिली.
यावेळी रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रवी बलूर्गी, डॉ. सातपुते, डॉ.पाटील, RBSK पथक ,सतीश पिसाळ, महादेव कामत,समुपदेशक महेश्वरी पाटील, बी एच पाटील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच गावातील नागरिक व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते..