Wednesday, June 18, 2025
Google search engine
Homecrimeनंदगाव येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

नंदगाव येथील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील नंदगाव येथील ओंकार भैरवनाथ पाटील (वय 21.रा.चावडी गल्ली) याने बुधवार (दि.04) रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास नंदगांव – नागाव दरम्यान असलेल्या हंचनाळ खडी नावाच्या शेतातील घरात लोखंडी पाईपला सुती पांढ़री दोरीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत ओंकार हा कोल्हापुरात मेकॅनिकलकडे मेकॅनिकचे काम शिकत होता.मंगळवारी रात्री कामावरून   व्यवस्थित आला होता.आज सकाळी साडे सातच्या सुमारास शेताला पाणी पाजण्यासाठी गेला होता.त्याच्या पाठोपाठ त्याचे वडीलही शेताला पाणी बघण्यासाठी गेले होते.पण शेतातील असलेल्या घराला बाहेरुन कुलूप लावलेले दिसले.त्याची मोटारसायकल बाहेर उभी असलेली दिसल्याने त्याच्या वडीलांनी खिडकीतुन डोकावून पाहिले असता ओंकार हा लोंबकळत असलेला आढ़ळला.ओंकारने पुढ़ील दरवाजाला कुलूप लावून पाठीमागच्या दरवाजाने घरात प्रवेश करून आतुन कडी लावून हा प्रकार केल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. त्याच्या पश्च्यात आई-वडील आणि एक भाऊ आहे. ओंकारच्या या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News