Friday, December 12, 2025
Google search engine
HomeSocialमांज्यात अडकून जखमी झालेल्या बगळ्याला जीवदान

मांज्यात अडकून जखमी झालेल्या बगळ्याला जीवदान

दिंडनेर्ली: सागर शिंदे
पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी झालेल्या बगळ्याला जीवदान देण्याचे काम द-याचे वडगाव (ता.करवीर)येथील माध्यमिक विद्यालयच्या शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनीनी केले. द-याचे वडगाव येथील माध्यमिक विद्यालयच्या शेजारी एक छोटासा पाण्याचा डोह आहे.या डोहाच्या पाण्यात कडेला एक बगळा दिवसभर एकाच जागेवरती उभा असल्याचे विद्यार्थ्याच्या दिसून आले.कुतूहल म्हणून मुले जवळ गेली तरी त्याची काहीच हालचाल दिसेना म्हणून त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला पण तरी देखील हालचाल झाली नाही.तेव्हा विज्ञान विषयाचे शिक्षक यु.के पाटील यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले तेव्हा खरी वस्तुस्थिती दिसली.
पतंगाच्या मांज्यात अडकून बगळ्याच्या पायाला मोठी जखमी झाली होती.त्यामुळे त्याला पायाची हालचाल करता येत नव्हती.शिक्षकांनी त्याला प्रथम सिद्धगिरी येथील पशवैद्यकीय दवाखान्यात नेले होते पण जखम मोठी असल्याने त्यांनी त्या बगळ्याला वन विभागाच्या ताब्यात दिले तर योग्य उपचार केले जातील असे सांगितले.त्यामुळे प्राथमिक उपचार करून पुन्हा त्याला कोल्हापूर येथील वन विभागाच्या पथकाच्या ताब्यात दिले.
धावपळीच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ही एका पक्षाच्या जीवासाठी विद्यार्थी,विद्यार्थिनीं , मुख्याध्यापक,शिक्षकांनी केलेली धडपड कौतुकास्पद आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News