कोल्हापूर:
पत्नीला लपवण्याचा संशयातून मेहुणीच्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना शाहूनगर ,कोल्हापूर येथे घडली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत मिळलेली माहिती अशी की, संतोष सुरेश माळी रा. यादव नगर कोल्हापूर हा व्यसनी असल्याने त्याची बायको एक महिन्यापूर्वी त्याला सोडून गेली होती. संतोष माळी यांची मेहुणी नकुशा कुमार चव्हाण व तिच्या घरातील लोकांनी बायकोला पळवून नेले आहे हा राग मनात धरून संतोष माळी यांनी व त्यांचे साथीदार प्रथमेश शिंगे यांनी मेहुणी नकुशी चव्हाण यांची पाच वर्षाच्या मुलगीचे दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता शाहूनगर ,कोल्हापूर येथून घरातून अपहरण केले होते.
संतोष माळी यांनी मुलीचे अपहरण करून तिच्या आईस(मेहुणीस)फोन करून माझ्या पत्नीला समोर आणा नाही तर तुमच्या मुलीस मारून टाकीन अशी धमकी दिली होती.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र करमळकर यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार त्यांच्या पथकाने आरोपी संतोष माळी व त्याचा साथीदार प्रथमेश शिंगे यांचा कसून शोध सुरू केला. मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या व स्थानिक चौकशीच्या आधारे आरोपी संतोष माळी यांचा साथीदार प्रथमेश शिंगे याला तवंदी घाटात सोडून अपहरण केलेल्या मुलीला घेऊन निपाणीच्या दिशेने गेला असल्याचे समजले. तपास पथकाने तत्काळ तवंदी घाटातून प्रथमेश शिंगे यास अटक केली. त्याची चौकशी केली असता संतोष माळी मुलीला घेऊन अर्जुन नगर निपाणी येथे गेल्याचे समजले.
त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन आरोपी संतोष माळी व अपहरण करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल आणि अपहरण केलेल्या मुलीस ताब्यात घेतले. व तिची सुखरूप सुटका केली.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस अंमलदार वैभव पाटील,गजानन गुरव, महेंद्र कोरवी ,योगेश गोसावी, विशाल खराडे, प्रदीप पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे प्रवीण पाटील नामदेव यादव ,कृष्णात पिंगळे आदींच्या पथकाने केली.
आरोपींना काही तासातच मोठ्या शिताफीने पकडल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.