Wednesday, June 18, 2025
Google search engine
HomeSocialशिवसेना वैद्यकीय कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी प्रशांत साळुंखे

शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी प्रशांत साळुंखे

कोल्हापूर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदी प्रशांत साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या नवनिर्वाचित राज्य कार्यकारणीच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून गोरगरीब-गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्ण काम मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे, यासह वैद्यकीय क्षेत्रात प्रशांत साळुंखे यांनी भरीव कामगिरी केल्याने त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
तसेच गंभीर महागडे शस्त्रक्रिया करावयाचे असलेल्या गोरगरीब गरजू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रशांत साळुंखे यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News