बालिंगा:(मोहन कांबळे प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुरगुड येथे झालेल्या केक मधील विषबाधेमुळे गावामध्ये आणि विक्रेते याच्यामध्ये सतर्कता होण्यासाठी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच शितल खाडे व ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावातील प्रत्येक दुकानदारांना एक पत्र दिले असून सदर पत्रामध्ये त्यांनी लिहिले आहे की मुरगुड येथील झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या दुकानांमध्ये विक्री झालेल्या सर्व खाद्यपदार्थांचे एक्सपायरी डेट आपण तपासणी करून मगच विक्री करावी. तसेच मुदतबाह्य खाद्यपदार्थाची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुदत बाह्य खाद्यपदार्थ विक्री केल्याचे निदर्शनास आलेस संबंधित विभागास कळविण्यात येईल व आपल्यावर कायदेशीर कारवाई झाल्यास त्या ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी असे लोकनियुक्त सरपंच सौ.शितल खाडे व ग्रामपंचायत अधिकारी यांनी कळविले आहे, या त्यांच्या उपक्रमा बाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.