Friday, January 16, 2026
Google search engine
HomePOLITICALविधानसभेच्या पराभवानंतर हा..बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार!

विधानसभेच्या पराभवानंतर हा..बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार!

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचीही मोठ्या प्रमाणात पीछे हाट झाली असं असतानाच निवडून झाल्यानंतर खान्देशातील बडा नेता अजित पवार गटात येणार आहेत.माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. जवळपास 5 हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गुलाबराव देवकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत
माजी मंत्री, जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली. सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल, अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे
spot_imgspot_img
RELATED ARTICLES
Today Live News
Most Popular News